परंपरा

chinchwad-home-banner-after-img

इतर सत्पुरुष

श्री विनायक उर्फ काका महाराज व श्री चिंतामणीचा तांदळा

chinchwad-kaka-maharaj-img

श्री चिंतामणी महाराज यांचा चार पुत्र झाले. त्याप्रमाणे जेष्ठ पुत्र श्री नारायण महाराज हे श्री मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तींची पूजा करीत असत. श्री काका महाराज यांना देखील आपण श्रीमंगलमूर्तींची पूजा करावी असे वाटत असे. एकदा श्री काका महाराज श्री मंगलमुर्तीना दुर्वा वाहण्यास गेले असता श्री नारायण महाराज यांनी त्यांना विरोध केला. या कृत्याचा श्री काका महाराज यांना राग आला व त्यांनी पण केला की, “दुसरा मंगलमुर्ती मिळवेन तेव्हाच चिंचवडात पाऊल टाकेन” असे म्हणून ते थेट मोरगावला गेले व श्रीमयुरेश्वराची आराधना करू लागले.  श्री काका महाराज यांची भक्ती पाहून श्री मयुरेश्वराने दृष्टांत दिला की, “मी या आधी तुझ्या घराण्यात श्रीमंगलमूर्ती रुपी अवतरलो आहे तरी तू श्रीक्षेत्र थेऊर येथे जाऊन तपश्चर्या कर.” त्याप्रमाणे श्री काका महाराज यांनी श्रीक्षेत्र थेऊर येथे जाऊन २१ दिवस नदीत उभे राहून उग्र तपश्चर्या केली. माशांनी शरीराचे लचके तोडले तरी देखील विचलित न होता तपश्चर्या चालू ठेवली. शेवटी श्रीचिंतामणी प्रसन्न झाले व तांदळारुपी गणेश श्री काका महाराज यांना प्राप्त झाले. त्याच वेळी जिंजीला छत्रपती राजाराम महाराज यांना दृष्टांत झाला की, “मी अवतरलो आहे.  माझी व्यवस्था कर मग.” त्याप्रमाणे श्रीकाका महाराज यांना थेऊर,जांबे,उरुळी,हिंजवडी हि गावे इनाम करून देण्यात आली. 

श्री काका महाराज मोठ्या इतमामात चिंचवडला आले. श्री नारायण महाराज यांनी त्यांना स्वतंत्र वाडा बांधून दिला व तेव्हा पासून भाद्रपद व माघ महिन्यात श्री चिंतामणीचा तांदळा घेऊन श्री काका महाराज यांचे वंशज यात्रेसाठी थेऊर येथे जाऊ लागले. सदर चिंतामणींचा तांदळा श्रीक्षेत्र चिंचवड येथे विराजमान आहे.

chinchwad-leave-img-divider
मराठी english