अहो मयूरक्षेत्री कऱ्हेतीरी देवा रहिवासू केला । भक्तिभाव देखोनिया चिंचवडी आला ।।
अहो मयूरक्षेत्री कऱ्हेतीरी देवा रहिवासू केला । भक्तिभाव देखोनिया चिंचवडी आला ।।
श्री मंगलमूर्ती, चिंचवड
चिंचवड हे अष्टविनायकांपैकी नसूनही, ज्यांच्यासाठी मोरगावचा श्री मयुरेश्वर चिंचवडला आला, अशा महान् तपस्वी श्री मोरया गोसावी महाराजांमुळे या स्थानाला अलौकिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील गणपतीच्या प्रमुख साडेतीन पीठांपैकी मोरगाव, राजूर आणि पद्मालय हे पूर्ण तर चिंचवड हे अर्धपिठ आहे. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले कारणाने ऐतिहासिक कागदपत्रात चिंचवडचा उल्लेख गणेशपूर या नावे आढळतो. श्री क्षेत्र चिंचवड हे पुण्यप्राप्तीच्या व उपासनेच्या दृष्टीने हे मोरगावइतकेच श्रेष्ठ मानण्यात येते. या ठिकाणी येथे अनेक भक्तांना दृष्टान्त झाले आहेत व अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. येथील श्रीमंगलमूर्ती वाड्यात श्रीमयुरेश्वर श्रीमंगलमूर्ती स्वरूपात विराजमान आहेत.