श्रीचिंतामणी महाराज देव (तिसरे) हे श्रीनारायण महाराज देव (दुसरे) यांचे ज्येष्ठ पुत्र होते. श्री मोरया गोसावी यांच्या कुळातील परंपरेप्रमाणे, हे सातवे श्री गणेशाचा अंश असलेले थोर सिद्धपुरुष होते. यांनी जास्त दिवस गादीचा उपभोग घेतला नाही. साधारण तीन वर्षे हे गादीवर होते.
ह्यांना पुत्र प्राप्ती नसल्याने ह्यांनी इ.स १८०४ मध्ये सिध्दटेक घराण्यातील गोविंद देव यांचा दुसरा मुलगा सखाराम देव यांस दत्तक घेतले व त्याचे नामकरण धरणीधर असे केले, दत्तविधानावेळी त्यांचे वय सहा वर्षे होते.
श्रींच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी निरुबाई यांनी गादीचा कारभार पहिला. निरुबाई यांनी इ.स.१८२० मध्ये गादीचा वारसा श्री धरणीधर महाराज देव (दत्तक) यांच्याकडे सोपविला.