श्री नारायण महाराजांनंतर त्यांचे जेष्ठ पुत्र श्री चिंतामणी महाराज हे गादीवर आले. त्यांनी आपले संपूर्ण जीवन हे श्री मंगलमूर्तींच्या सेवेत घालविले. यांच्यात पण श्री गणेशांचा अंश होता. हे सत्पुरुष व साक्षात्कारी होते. यांच्या कार्यकाळात थेऊर येथील देवालयाचे काम पूर्ण झाले. त्या काळातील राज्यकर्त्यांकडून संस्थानला काही जमिनी इनाम म्हणून मिळाल्या. तसेच अनेक गावांची सरदेशमुखी मिळाली. त्यामुळे संस्थांनचे उत्पन्न वाढले. त्यांनी अनेकांना श्री गणेश संप्रदायाकडे व भक्ती मार्गाकडे वळविले व गरजूंना आर्थिक मदत सुद्धा केली.