क्षेत्रमाहात्म्य

chinchwad-home-banner-after-img

श्रीक्षेत्र चिंचवड

चिंचवड हे अष्टविनायकांपैकी नसूनही, ज्यांच्यासाठी मोरगावचा श्रीमयुरेश्वर चिंचवडला आला, अशा महान् तपस्वी श्रीमोरया गोसावी महाराजांमुळे या स्थानाला अलौकिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. संत ज्ञानेश्वरांनी आळंदीला ज्याप्रमाणे संजीवन समाधी घेतली, त्याचप्रमाणे श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांनी चिंचवडला संजीवन समाधी घेतली आहे. श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराजांच्या तपश्चर्येमुळे चिंचवडला अष्टविनायक क्षेत्राइतके महत्त्व प्राप्त झालेले आहे. हे एक जागृत स्थान आहे. महाराष्ट्रातील गणपतीच्या प्रमुख साडेतीन पीठांपैकी मोरगाव, राजूर आणि पद्मालय ही पूर्णपीठे तर चिंचवड हे अर्धपीठ आहे. पूर्वी या ठिकाणी चिंचेच्या झाडांचे मोठे जंगल होते म्हणून या गावाला चिंचवाडी, चिंचूर हे नाव पडले. कालांतराने श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या कारणाने ऐतिहासिक कागदपत्रात चिंचवडचा उल्लेख गणेशपूर या नावाने आढळतो. श्री क्षेत्र चिंचवड येथे श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज हे संजीवन समाधिस्त असून अनेक भक्तांना याबाबतचे दृष्टान्त व अध्यात्मिक साक्षात्कार झालेले आहेत. अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. अश्या या पवनाकाठच्या पावन परीसराबद्दल पदांच्या गाथ्यात श्री महाराज म्हणतात,

“तुमचे येणे झाले येथवरी || चिंचवड पुण्य हो क्षेत्र भारी ||”

(पदांचा गाथा, पद क्र.६६)

 

chinchwad-leave-img-divider
मराठी english